January 11, 2025

गोरंबे / प्रतिनिधी

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज गोरंबे तालुका कागल येथे समरजीतसिंह घाटगे व मंडलिक गटाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना,श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्राध्यापक सुभाष मगदूम म्हणाले ,गट तट न बघता तालुक्यातील उमेदवार असल्याने आपण मडलिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे .गोरंबेवर विशेष लक्ष आहे मतदाराला जाणीव करून द्या .मोदींनी सर्व योजना थेट खात्यावर दिल्या .मडलिकांना साथ म्हणजे मोदींना साथ हे माहिती असू द्या .
राजे बँकेचे चेअरमन एम .पी .पाटील म्हणाले ,मंडलिक यांनी प्रचंड कामे केली परंतु जाहिराती केल्या नाहीत हि त्यांची चूक झाली आहे .एक काम करणारा माणूस जाणीवपूर्वक राजकारणासाठी दुर्लक्षित केला जात आहे .आपल्याला मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांनाच निवडून देणे गरजेचे आहे
यावेळी शाहू कारखान्याचे संचालक डी एस पाटील ‘ मळगेचे उपसरपंच दिगंबर अस्वले ,आर एस पाटील ,राजू जाधव , विलास पाटील ,पप्पू हूरे ,अमर सुतार ,आदी उपस्थित होते .स्वागत प्रास्ताविक चेअरमन चंद्रकांत दंडवते यांनी केले तर आभार ऋषिकेश ढोले यांनी मानले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *