December 23, 2024

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर ता. २८ : मी राजर्षि शाहू महाराज व राजाराम महाराज यांचा रक्तामांसाचा आणि विचाराचा वारसदार आहे. विद्यमान शाहू छत्रपती इस्टेटीचे वारसदार होवू शकतात. राजर्षी शाहू महाराज यांचे वारस नाहीत.

या नात्याने आपण जिल्ह्यातील प्राध्यापक संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारां ना विजयी करा असे जाहीर आवाहन करतो असे भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदे त आग्रहाने सांगितले .यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सभागृह नेते सत्यजित उर्फ नाना कदम किरण शिंदे बापूसाहेब निंबाळकर आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना कदमबांडे म्हणाले कि ,‘ राजर्षी छत्रपतींचे वारसादार छत्रपती राजाराम महाराज आहेत. मात्र श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे छत्रपती राजाराम महाराजांचे वारसादार नाहीत. मी प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा आणि न छत्रपती शाहू महाराज यांचा पणतू आहे. त्यामुळे मी राजर्षी शाहू महाराजांचा वारसदार आहे. धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अध्यक्ष असून आमदार म्हणूनही काम केले आहे. कोल्हापुरशी माझा पूर्वापार ऋणानुबंध आहे. येथील हातकणंगले मतदारसंघातून मी निवडणूक ही सन 1984 साली लढवली होती ‘ अशी ही माहिती त्यांनी दिली .

मी राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारस आहे. त्यांचा विचार मी लोकांमध्ये पोहचवला आहे. विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमच्यातील संपत्तीचा वाद हा आम्ही न्यायालयात सोडवू. तो आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्याचा निवडणुकीशी संबंध नाही. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून प्रचारासाठी आलो आहे. असे राजवर्धन कदमबांडे यांनी सांगित
कोणाचा पाठिंबा घ्यायचा तो त्यांचा प्रश्न
एम.आय.एम पक्षाने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारसे असता राजवर्धन कदमबांडे म्हणाले, ‘मुस्लिम सुलतानांनी हिंदूंची मंदिरे पाडली. माझ्या विरोधात एम.आय.एम. चा उमेदवार होता. त्यांनी २३०० मतांनी माझा पराभव केला. कोणाचा पाठिंबा घ्यायचा हा त्यांचा विषय आहे असे ही त्यांनी यावेळी नमूद केले. कोल्हापूर जनतेची इच्छा असल्यास आणि पक्षानेही मला तसे सूचना केल्यास धुळ्याप्रमाणे मी येथेही सक्रियपणे काम करेल अशी सूचक वक्तव्य करत शेवटी राजवर्धन कदमबांडे यांनी केले . यासह आगमी धुळे येथील प्रचार समन्वयवका प्रमाणे कोल्हापूरात ही संघटनात्मक काम करण्यास नक्कीचं आवडेल ‘ असेही त्यांनी पत्रकार परिषदेसह वृत्तवाहिनी स दिलेल्या मुलाखतीत नमूद केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *