कागल /प्रतिनिधी
महायुती विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढत आहे. गेल्या पावणेदोन वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रचंड विकासकामे नवीन प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यासह देशात चांगले वातावरण असून जनतेनेच पुन्हा एकदा ‘फिर एकबार मोदी सरकार’ असे ठरविले आहे, असे नविद मुश्रीफ यांनी सांगितले.*
*कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुळकुड, ता.कागल येथे महायुतीच्या प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत ते बोलत होते.
यावेळी गोकुळजे संचालक युवराज पाटील (बापू) म्हणाले, येणाऱ्या ०७ मे रोजी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.
यावेळी सरपंच अर्चना परीट, युवराज पाटील (सुळकुड), प्रकाशराव पाटील, शेखर पाटील, भिमगोंडा पाटील, बाळासो हेगडे, बाळासो पाटील, शिवाजी लगारे, सुकुमार हेगडे, शरद धूळूगडे, तात्यासो वाणी, अरुण मुदाण्णा, धोंडीराम हेगाजे, शिवकुमार पाटील, कलगोंडा पार्वते, सचिन परीट, दादासो चवई, महायुतीचे प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.