
(कोल्हापूर/ प्रतिनिधी)
महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने भगवा फडकावल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीनं कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात चर्चेत असलेल्या समरजीत घाटगे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला पूर्णविराम मिळाला असून, त्यांचा अधिकृत प्रवेश देखील लवकरच होणार आहे. राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या कोल्हापूर बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण सूचना करत युती कायम ठेवण्याचं आवाहन केलंय.



