(बिद्री / प्रतिनिधी) :
मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या साथीदारांनी दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याच्या घटनेचा बिद्री पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी विविध दैनिकांच्या व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जमादार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली.
याप्रसंगी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी पेलणारा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार भूमिका बजावतात. अन्यायी घटनांना प्रसिद्धी देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवरच अशा प्रकारचे हल्ले होणे ही लांछनास्पद घटना आहे. राजकीय दबाव झुगारुन पोलिसांनी या घटनेचा तपास करुन मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरुन पुन्हा अशा प्रकारे पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस कोणीही करणार नाही.
यावेळी भैरवनाथ डवरी, टी. एम. सरदेसाई, एस. के. पाटील, विजय पाटील, दत्तात्रय वारके, दत्तात्रय लोकरे, श्रीकांत जाधव, रमेश वारके, सुभाष पाटील, प्रशात साठे, अंकुश पाटील, निवास पाटील, तुकाराम कुंभार, बाजीराव बरगे, समाधान म्हातुगडे, सुहास घोरपडे, सुनील माजगावकर आदी पत्रकार उपस्थित होते.