(वडगाव /प्रतिनिधी )
दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांनी खरी बातमी दिल्याच्या रागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली होती. या घटनेचा निषेध करण्यात आला.
त्यांच्यावर अटकेची तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्याचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात यावे. या मागणीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने वडगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी विवेक दिंडे, सुहास जाधव , राजकुमार चौगुले , संतोष सणगर , आयुब मुल्ला, सचिन पाटील , नाना जाधव , रविंद्र पाटील , संतोष भोसले , प्रकाश सावर्डेकर , मोहन शिंदे उपस्थित होते.