(करवीर /प्रतिनिधी )
दैनिक सकाळचे मुरगूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांनी खरी बातमी दिल्याच्या रागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली होती. या घटनेचा करवीर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला.
व त्यांच्यावर अटकेची तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्याचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात यावे. या मागणीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करवीर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. करवीर चे ठाणे अंमलदार वसंत शेळके, गोपनीयचे अधिकारी अविनाश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी निवेदन देताना डॉ. निवास वरपे, विश्वनाथ मोरे, रामचंद्र रोटे व सुवीत पाटील उपस्थित होते.