व्हनाळी / प्रतिनिधी – सागर लोहार
लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवतात तश्याच आठवणी यरनाळ ता. निपाणी येथील विद्यार्थ्यांनी तब्बल 21 वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या.निमित्त होते मराठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे
शिक्षकांनी केलेले सुसंस्कार, चुकीच्या वेळी केलेली ती शिक्षा, वर्गातील गमती -जमती, परीक्षेचा तणाव, निकालाची उत्सुकता अशा अनेक आनंदी तर काही भावनिक आठवणींना उजाळा देत यरनाळ येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता सातवी मधील 2002- 2003 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या आवारात उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला.
प्रारंभी पुष्यवृष्टी करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी शितल सुतार,सिमा संपाळ, अस्मिता मोळके, सरिता मोलके, अमित डावरे, धनाजी घाटगे, अर्चना डावरे, विनोद भोसले यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास शोभा मोरे ,रेणुका पोवार ,दिपाली पोवार विद्या शेंडे,अमर गुरव आदी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.स्वागत संपदा संपाळ यांनी केले आभार संतोष गुरव यांनी मानले.