मांगनूरमध्ये बुध्द जयंतीनिमित्त केले अभिवादन
भगवान गौतम बुद्ध यांचे विचार व शिकवण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.ते सर्वांनीच आचरणात आणावेत.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मांगनूर(त.कागल) येथे बुद्ध जयंतीनिमित्त जयभीम तरुण मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच विनायक मुधाळे होते.
यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.तसेच छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन.त्यांनी अभिवादन केले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले,भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून त्यांचा प्रचार व प्रसार केला.त्यांना छत्रपती शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले. जगात आदर्श असलेल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये अशा थोर पुरुषांच्या चांगल्या शिकवणीचे व विचाराचे प्रतिबिंब पहावयास मिळते.हे अभिमानास्पद आहे.
यावेळी उपसरपंच व गडहिंग्लज बाजार समितीच्या सदस्या पूनम मोहिते, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब तांबेकर, महादेव फराकटे, अशोक जाधव, लहू कांबळे, सुरेश कांबळे, भगवान कांबळे, जीवन कांबळे, सतीश कांबळे, मच्छिंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
स्वागत सागर मोहिते यांनी केले.बबन कांबळे यांनी आभार मानले.
दलित समाजाच्या सुखदुःखाशी समरस
श्री घाटगे यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या दलित समाजातील महिला,तरुण व मुले यांच्याशी संवाद साधला.यावेळी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून दलित समाजाशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. त्यांच्या सुखदुःखात समरस होता येते.याचे समाधान वाटते.असे सांगत राजकारणापलीकडे जाऊन या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली.