December 23, 2024

(म्हाकवे /प्रतिनिधी)

बस्तवडे (ता.कागल)येथील पंकज मोळके या भुमीहीन कुटूंबातील युवकाच्या व्यावसायिक बनण्याच्या पंखांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनाचे बळ मिळाले.राजे बँकेच्या सहकार्याने पंकजने चटपटीत कुरकुरे व इतर पदार्थ बनविण्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसविला.त्याच्या या व्यवसायास घाटगे यांनी भेट देऊन मालवाहतुकीसाठी घेतलेल्या गाडीचे पूजन केले.दोन वर्षाच्या अल्पकाळात त्यांनी या व्यवसायात केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. पंकज यांची स्वतःची एक गुंठाही जमीन नाही. त्यांचे कुटुंबीय भागाने इतरांची जमीन कसतात.तसेच देशी गाई पाळून त्यांचे दूध, तूप व इतर पदार्थ यांची विक्री करतात. आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार असलेल्या पंकज यांची व्यवसाय करण्याची इच्छा आर्थिक अडचणीमुळे अपूर्ण होती.याच दरम्यान त्यांना समरजितसिंह घाटगे राजे बँकेच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी घाटगे यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. राजे बँकेकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतून दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य घेऊन वैभव फुड्स या नावाने व्यवसाय सुरू केला. कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या उत्पादनांचा चांगलाच जम बसला आहे. बेकरी व्यवसाय करू इच्छिणारे अनेक तरुण त्यांच्या व्यवसायास भेट देऊन माहिती घेण्यासाठी येतात.राजे बँकेचे अर्थसहाय्य व समरजितसिंह घाटगे यांचे मार्गदर्शन यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकलो.नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांनी खचून न जाता छोटे-मोठे व्यवसाय करावेत. असे यावेळी मोळके यांनी सांगितले.कोट बहूजन समाजातील होतकरु युवकांना उद्योजक बनविण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर’ संकल्पनेतून व्यवसायाचे एक व्यासपीठ निर्माण केले.ज्यात नवव्यावसायिकांना कोल्हापूरच्याच नामांकित ब्रँड्स बरोबर काम करण्याची संधी मिळाली.त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन,आर्थिक सहाय्य,विक्रीसाठी प्रोत्साहन अशा विविध सुविधा एकाच छताखाली उपल्बध करुन दिल्या.तरूणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे व इतरांना रोजगार द्यावा,हा आमचा उद्देश अशा यशस्वी तरुणांमुळे सफल झाला आहे.-राजे समरजितसिंह घाटगे छायाचित्र बस्तवडे येथे मालवाहतुकीसाठी मोळके कुटुंबीयांनी घेतलेल्या चार चाकी गाडीच्या पूजनवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *