(कागल/ समाधान म्हातुगडे )
विज ग्राहकना स्मार्ट प्रॉपेड़ मीटर बसवण्याची सक्ति केली जाणार आहे यामुळे ग्राहकावर आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे स्मार्ट प्रीपेड कार्ड मीटर रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा शिवसेना (उबाठा ) कागल शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात मोठया प्रमाणत विजेची मागणी असून येथे विज चोरी होत नाही. ग्राहकांची संख्या जास्त आहे विज बिल वेळेवर भरतात तरीही स्मार्ट मिटरसक्ती का? याबाबत सर्व ग्राहक याच्यात तीव्र नाराजी आहे. तरी मराविम’ने हा निर्णय रद्द करावा. विद्युत् ग्राहक शेतकरी छोटे मोठे उद्योग ग्राहक यांच्या मागणी नुसार हा निर्णय रद्द करा अशी मागणी केली आहे.
शिवसेना ( उबाठा )कागलवतीने म. रा. वि. म. उपविभाग कागल उपअभियंता श्री घोलप यांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे,शिवसेना संघटक मारूती पूरीबुवा, तालुका प्रमुख शिवगोंड पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख दिग्विजय पाटील, शहर प्रमुख आदिनाथ पाटील, महालु करिकटी, अजित मानडेकर लक्ष्मण लाड़, जि आर कासीद, किरण दळवी, शीतल मुळे आदी शिवसैनिकानी निवेदन दिले.