(कोल्हापूर : प्रतिनिधी )
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी नारायण सुतार यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ही निवड जाहीर केली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे , राज्याचे उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अजित कुंकूलोळ अदिंच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांपासून संघटनेची घौडदौड सुरू आहे. देशात क्रमांक एक ची संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहीले जाते. पत्रकार व त्यांच्या कुटूंबाला आरोग्य सुविधा मिळाव्यात, हक्काचे घर मिळावे, यासह निवृत्ती नंतर भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कार्यरत आहे.