(गारगोटी/ प्रतिनिधी)
पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी केले.
ते येथील आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव प्रमुख उपस्थित होते.
प्रांताधिकारी सूळ म्हणाले, कारागीर व शिल्पकार याना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यास प्राधान्य दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी संस्थेस आचार्य चाणक्य कौशल्य योजनेचे केंद्र मिळाले आहे. या योजनेत शिल्पकार व कारागिरांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.या योजनेची नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण व विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही प्रास्ताविकात दिली.
यावेळी आबिटकर इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारीत केला. यावेळी प्रा. धीरज देसाई, प्राचार्य डॉ. अमर चौगले, डॉ. दीपाली गोसावी, धीरज गुदगे, प्रा. मनोज आळवेकर, दीपक पाटील, मुरलीधर पाटील, कविता कुरळे, मयुरी कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन तृप्ती उरुणकर यांनी केले, आभार तेजस्विनी कदम यांनी मानले.