(मुरगूड/ जोतीराम कुंभार)
मुरगूड येथील पैलवान आनंदा महादेव मांगले वय वर्षे 46 यांचा जीन्यावरून घसरून अपघाती निधन झाले. या घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.
मुरगूड पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि.24 रोजी सकाळी पै. आनंदा मांगले हे त्याच्या राहत्या घरातील जिन्यावरून पाय घसरून पडल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यावेळी त्यांना ताबडतोब उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे नेले पण ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरानी सांगितले चुलत भाऊ संभाजी मांगले यांनी या घटनेची वर्दी मुरगूड पोलीस ठाण्यात दिली तपास सहायक फौजदार जरग हे करीत आहेत.
नगरसेविका रेखाताई मांगले यांचे ते पती होत.पैलवान आनंदा मांगले यांनी राष्ट्रीय कुस्तीत त्यांनी मोठी कामगीरी केली होती. मुरगूडमधे कुस्ती मैदान भैरवण्यात ते नेहमी अग्रेसर होते मुरगूडमधील ते एक नामवंत पैलवान म्हणून परिचीत होते तसेच ते दानशुर व्यक्तिमत्व होते. ते एक यशस्वी उद्योजक ते हॉटेल व्यवसाईक होते. बैलगाडी शर्यतीमधे संपूर्ण महाराष्ट्र व सीमा भागामधे दबदबा होता. त्यांच्या निधनाचे वृत कळताच विविध मंडळाचे कार्यकर्तै हजर होते. राहत्या घरापासून ते स्मशानभूमी पर्यत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, जिल्हा शिवशेना प्रमुख राजेखान जमादार, यशोवर्धन मंडलिक जि. प. सदस्य मनोज फराकटे, डॉ. रमेश भोई, व इतर संस्थाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संखेने हजर होते मांगले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.
पैज लावणारा पैलवान
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा निष्ठावत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख तसेच मंडालिक गटाचा शिलेदार म्हणून ते सर्वपरीचीत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मंडलिकासाठी त्यांनी दहा लाख रुपयाची पैज लावली होती पैज हरल्यानंतर पैजेची रकम जिंकणाऱ्याला सुपूर्द केली प्रतेक इलेक्शनला अशी पैज ते लावत होते त्यामुळे मडलिकासाठी लाखोची पैज लावणारा पैलवान अशी त्यांची जिल्हाभर ओळख होती.