मळगे बुद्रुक/ प्रतिनिधी
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री बनलो. पण, सत्तेची हवा डोक्यात जाऊ दिलेली नाही. कागलमधील जनतेची सेवा करीत आहे करीत राहणार.
मी राहण्यासाठी कोल्हापूरला गेलेलो नाही, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मलगे बुद्रुक येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यामध्ये सांगितले.ते पुढे म्हणाले विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात राज्यात ‘बारामतीनंतर कागल’चाच नंबर लागतो,असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी मळगे बुद्रुक मधील विकास कामांचा आढावा घेतला.
कागल तालुक्याचे कार्यक्षम आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ हे विकासपुरुष आहेत. समाजातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याचे काम करीत असून तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणत आहे. पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणला असून, तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे असे मत बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
यावेळी भगवान अस्वले, सतीश पाटील ,एकनाथ पाटील, कृष्णात सोनाळे यांनी मनोगते व्यक्त केली. बिद्री साखर कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, सुनील सूर्यवंशी,रावसो खिलारी, राम विकास सेवा सोसायटीचे संस्थापक आनंदराव अस्वले, जीवन शिंदे, रघुनाथ अस्वले, निवास परबकर, श्रीकांत पाटील, नंदकुमार पाटील, प्रवीण पाटील, उदय पाटील,सरपंच नलिनी सोनाळे, वैशाली अस्वले, मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी गोल्हार यांनी केले तर आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले.