(कोल्हापूर/ प्रतिनिधी)
“जर हे सरकार गेलं तर, येणारे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार त्यामुळे लाडकी बहीण नाराज होणार, असल्याचं वक्तव्य आ. सदाभाऊ खोत यांनी केलंय. ते जत तालुक्यातील उमदी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
“दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल, त्यामुळे याचा पश्चाताप नवरोबांना होणार आणि यासाठी मला आंदोलन करण्यासाठी या तालुक्यात यावं लागणार”, असंही ते यावेळी म्हणालेत.