( बिद्री / प्रतिनिधी )
बोरवडे ( ता. कागल ) येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरास ‘ ब ‘ वर्ग दर्जा मिळवून देत मंदिर परिसरातील सुशोभिकरणासाठी ना. मुश्रीफ यांच्याकडून साडेचार कोटींचा निधी मिळावून आणल्या बदल बिद्री साखर कारखान्याचे संचालक व माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे यांचा सत्कार ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला .
या वेळी बोलताना श्री. फराकटे म्हणाले, २०१८-१९ साली पालकमंत्री मुश्रीफ यांच्यामुळे मंदिराला ‘ ब ‘ वर्ग दर्जा मिळाला. शिवाय याच वर्षी मंदिरासाठी दोन कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला होता. तर २०२४-२५ या सालात आता नव्याने २.६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दर्शन रांग, प्रसादालय हॉल, मंदिर परिसर सुशोभीकरण, बसुदेव मंदिर सुशोभीकरण, मरगुबाई मंदिर सुशोभीकरण, पालखीमार्ग खडीकरण – डांबरीकरण आदी विकासकामामुळे मांदिराच्याव आणि त्या गावाच्या सौदर्या मध्ये भर पडणार आहे होणार आहे .
यावेळी माजी पं स सदस्य रघुनाथ कुंभार माजी उपसरपंच तानाजी साठे . जेतिराम साठे . आनंदा साठे तानाजी साठे ( केबल ) . पांडुरंग खाडे . याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .