कागल / प्रतिनिधी
बामणी ता. कागल येथील समरजीत घाटगे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
बामणी येथील मा.विजय जालिंदर कांबळे, जालिंदर देवबा कांबळे, अशोक देवबा कांबळे, गौतम देवबा कांबळे, अमर तानाजी कांबळे, रोहिदास रामचंद्र सोरटे, अनिल रघुनाथ जिरगे, शशिकांत पांडुरंग कांबळे , नागेश सदाशिव कांबळे, स्वप्निल प्रल्हाद कांबळे, विनोद दगडू कांबळे, दत्तात्रय सुरेश कांबळे, जनार्दन रामचंद्र कांबळे यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, बामणीतील प्रमूख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी मध्यरात्रीसुद्धा हाकेला ओ देऊन मी या सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन.
यावेळी माजी सरपंच रावसाहेब पाटील, युवराज पाटील, ॲड. सुशांत पाटील, शिवाजीराव मगदूम, महादेव कोईगडे, रामचंद्र चौगुले, सचिन मगदूम, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.