सेनापती कापशी / प्रतिनिधी
राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांची तरुण पिढी, आबाल वृद्धांसह छोट्या-छोट्या बालकांच्या मध्येही क्रेझ कायम आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे संपूर्ण राज्यभर वाहत आहे. त्यातच राजकीय विद्यापीठात प्रचंड संघर्षाची धार निर्माण झाली आहे. बुधवारी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आडी येथील राजीवजी महाराजांचे दर्शन घेऊन आजच्या प्रचाराला सुरुवात केली.
अर्जुनी, गलगले, मेतके येथील प्रचारक बैठका आवरून ते दुपारी करड्याळ येथे आले होते. त्यावेळी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळेच्या खिडकीतून मंत्री मुश्रीफ यांना हात उंचावून टाटा करत त्यांना प्रोत्साहन देत होते. मंत्री मुश्रीफ यांनीही त्या बालकांना हात उंचावून अगदी आनंदाने बालकांच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांची क्रेज कायम असल्याचे दिसून आले.