वडगांव / प्रतिनिधी
गेल्या तीस-चाळीस वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत पहाटे पासून रात्रीपर्यंत गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आयुष्य वेचले, कागल मतदार संघातील जनता याची साक्षीदार आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या सर्वांचे ऋण मी या जन्मी तरी फेडू शकत नाही. असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
वडगाव ता. कागल येथे झालेल्या संपर्क बैठकीत बोलत होते. यावेळी हणबरवाडी येथेही बैठका झाल्या.
भाषणात बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मिळालेल्या सत्तेचा वापर गोरगरिब व वंचित, शोषितांसाठी केल्या, त्यासाठी प्रसंगी प्रचलित कार्यातही बदल केला. परिणामी शासनाच्या सर्व योजना गावांबरोबर वाड्या -वस्त्यांवर पोहचविल्या.
शशिकांत खोत म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांनी डोंगर कपारीत वसलेल्या चिकोत्रा खोऱ्यातील वाड्या-वस्त्यांवरील दारोदारी विकासाची गंगा पोहोचवली.
वडगाव येथे सरपंच श्रीमती स्नेहलता मोरे, लगमाना कांबळे, रवींद्र देवठाणेकर, सोनूसिंग घाटगे, डी. बी. कांबळे, तानाजी पाटील, आनंद आडनाव, रतन कांबळे तसेच हणबरवाडी येथील बैठकीत प्रताप खोत, विलास खोत, मारुती पोवार, सदाशिव पोवार, विशाल डाफळे, प्रांजली ढोपे, आनंदा मोहिते, सदाशिव चौगुले आदी उपस्थित होते.
लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी….
कापशी खोऱ्यातील सर्वच संपर्क बैठकांना माता-भगिनींची प्रचंड मोठी उपस्थिती होती. माझ्या संरक्षणासाठी माझ्या लाडक्या बहिणी नेहमीच अग्रभागी राहिले आहेत,असे गौरवोद्गारही आमदार मुश्रीफ यांनी काढले.
एकदा भेट घेऊन बघा…
वडगाव येथील कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा एका काव्यरूपाने घेतला आणि शेवटी ते म्हणतात, एकदा आमच्या या नेत्याची भेट घेऊन बघा मग त्यांचं कार्य कर्तुत्व जवळून बघता येईल… त्यावेळी टाळ्या झाल्या…
वडगाव ता. कागल येथे आयोजित बैठकीत बोलताना हसन मुश्रीफ व समोर ग्रामस्थ व महिला