गडहिंग्लज / प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांच्या विविध योजना पारदर्शकपणे राबविलेल्या आहेत.त्यामुळे येत्या काळात उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भारत देशास महासत्ता बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार खास.संजय मंडलिक यांना उच्चांकी मतांनी निवडून देऊन मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुया,असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
महायुतीचे उमेदवार खास.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज, ऐनापूर,अत्याळ,इंचनाळ येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. श्री.घाटगे पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच बाबतीत जागतिक स्तरावर भारताची मान उंचावलेली आहे.त्यांनी केलेल्या विविध कामांची पोचपावती म्हणून त्यांना अपेक्षित असणारे”अब की बार चारशे पार”चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खास. मंडलिक यांना निवडून देऊया.
मंडलिक कारखान्याचे संचालक ॲड.विरेंद्र मंडलिक म्हणाले, खास.संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत या लोकसभा मतदार संघात आठशे कोटींची विकासकामे पूर्ण केली आहेत.विकासकामांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर मोठा अन्याय झाला.मात्र महायुतीच्या सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच या मतदारसंघात विकासकामे मार्गी लागली. यावेळी विठ्ठल पाटील, प्रतिभाताई पाटील,आशाताई देवर्डे,अनिता चौगुले, भिमराव कोमारे, अभिनंदन पाटील ,अजहर बोझगर, चंद्रकांत सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजे बॅंकेचे संचालक रविद्र घोरपडे,संजय संकपाळ, महेश भादवणकर,वैभव ठोंबरे,सागर कुराडे,वामन बिलावर, अजित पाटील,अण्णासाहेब पाटील( खातेदार), ॲड.सुरेश कुराडे,सुर्याजी मोहीते,अमृत पाटील, गणपतराव सुर्यवंशी यांच्यासह भाजपाच्या विविध सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत तालुकाध्यक्ष प्रितम कापसे यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण यांनी मानले.
आयुष्यमान योजना सर्वसामान्यांची “एफ.डी”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेमुळे सामान्य माणसांना निरोगी आयुष्य लाभले. पाच लाख रुपया पर्यंतचे विमा कवच या योजनेतून गोरगरीबांना मिळाले. त्यामुळे सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी देखील पंतप्रधान मोदी यांनी या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची सामान्यांसाठी स्वतंत्र एफ.डी.(स्वतंत्र अर्थिक तरतूद ) केली आहे असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगताच उपस्थित सर्वांनीच टाळ्या वाजवून मोदीजींच्या या योजनेचे स्वागत केले.