December 23, 2024

मुरगूड/ प्रतिनिधी : जोतीराम कुंभार

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे . ही सेवा देण्यासाठी वीज कामगारांचे योगदान महत्वाचे आहे . वीज ग्राहकांनी सुध्दा सेवेला प्रतिसाद दयायला हवा . वीज ग्राहक व वीज कर्मचारी यांच्यात समन्वयाची भूमिका हवी असे प्रतिपादन वीज महावितरणच्या मुरगूड विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत येडगे यांनी केले .

वीज महावितरण कंपनीच्या मुरगूड विभागाने चालू आर्थिक वर्षात वीज बीलं थकबाकी वसुलीचे निरंक उद्दीष्टपूर्ती केल्याबद्दल वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून गुणगौरव करण्यात आला . याप्रसंगी श्री येडगे बोलत होते . यावेळी कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक उत्तम लांडगे प्रमुख उपस्थित होते .

या प्रसंगी बोलताना पत्रकार प्रा . सुनिल डेळेकर म्हणाले , मुरगूड विभागाला गुणी व जिद्दी वीज कर्मचारी व अधिकारी मिळाल्यामूळे वीज पुरवठ्याची सेवा चांगली मिळत आहे या विभागातील २८ कोटीची वीज बील वसुली करून निरंकचे उद्दीष्ट पूर्ण केले व जिल्हयात या विभागाचा सन्मान वाढला ही कौतुकास्पद बाब आहे .

याप्रसंगी बोलताना पत्रकार मधुकर भोसले म्हणाले ‘ _ वीज कर्मचारी आणि समाजाचं वेगळं नातं आहे . हे नाते जोपासत जीव धोक्यात घालून कर्मचारी व अधिकारी बांधव सेवा देतात . हा त्यांच्या सेवेचा गौरव आहे . यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश तिराळे यांनीही कृतज्ञता व्यक्त करुन वीज महावितरणच्या मुरगूड विभागाचे कौतुक केले .

याप्रसंगी बिलिंग विभागाचे अकौंटंट कृष्णात डोणे .वीज लाईनमन समाधान मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले .

वीज महावितरण कंपनीच्या मुरगूड विभागातील सर्व अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आला .

या कार्यक्रमास मुरगूड ग्रामीणचे सहाय्यक अभियंता अमोल बिराजदार , सोनगे उपविभागाचे सहाय्यक अभियंता संतोष सरोळे ‘ कापशी उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत करनूरकर , कनिष्ठ अभियंता संग्रामसिंह घोरपडे , लिंगनूर उपविभागाचे कनिष्ठ अभियंता सुदेश जाधव ‘ पत्रकार अनिल पाटील ,महादेव कानकेकर ‘दिलीप निकम ‘ राजू चव्हाण ‘ ओंकार पोतदार , शशिकांत दरेकर व मुरगूड विभागीय सर्व वीज कर्मचारी वर्ग उपस्थित होता .

स्वागत व प्रास्ताविक मुरगूड शहरचे सहाय्यक अभियंता प्रकाश पाटील यांनी केले तर कृष्णात डोणे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *