December 23, 2024

कडगांव / प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सदैव आग्रही राहून मराठा समाजाला पाठबळ दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या “एक मराठा: लाख मराठा” या क्रांती मोर्चा मध्येही ते हिरीरीने सहभागी झाले आहेत त्यामुळेच अखिल भारतीय मराठा महासंघाने त्यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांनी केले.

कडगाव ता. गडहिंग्लज येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत श्री. देसाई बोलत होते. गोड साखरचे चेअरमन प्रकाश पताडे, व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण, संचालक बाळासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पाटबंधारे खात्याची काही महिन्यांकरिता माझ्याकडे जबाबदारी आली. तेव्हा आंबेओहळ उच॔गी, नागणवाडी या प्रकल्पांना निधी तर दिलाच. शिवाय; प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपण पॅकेज आणले. पॅकेज स्वीकारल्यानंतरच प्रकल्पाच्या कामाला गती आली. आंबेओहोळ मध्ये पाणी अडवूनच आपण मते मागायला आलो आहे. मला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

जेंव्हा हा मतदार संघ कागल मतदार संघाला जोडला गेला, तेव्हापासून फार मोठे काम उभे केले. दळणवळण, पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावी पणे राबविल्या गेल्या आहेत. एकूणच कागल विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणता आला. त्यामुळे इतकी प्रचंड विकासकामे केली आहेत. उर्वरित कामे करण्यासाठी पुन्हा संधी द्या, असे आवाहनही केले.

यावेळी सरपंच सौ. अर्चनाताई पाटील, उपसरपंच सचिन सावंत, माजी सरपंच संजय बटकणंली, सदानंद पाटील, नेताजी पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, बंटी पाटील, सुदर्शन पाटील, संग्राम घाटगे आदी उपस्थित होते.

यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करेल…!

विरोधक म्हणतात, मंत्री मुश्रीफ यांनी गोड साखर बंद पाडला… याचे प्रत्युत्तर देताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, असे होईल का? ज्या-ज्या वेळी हा साखर कारखाना अडचणीत आला, त्यावेळी आपण सर्व ताकतीनिशी मदत केली. सुरुवातीला ५५ कोटी रुपये, नंतर ४९ कोटी रुपये जिल्हा बँकेतून कर्ज पुरवठा केला. नोकरांचे पगार भागवले. आठ वर्षे हा साखर कारखाना सुरळीत चालला होता. मात्र अडचणी निर्माण केल्या. आता पुन्हा मी तुम्हा सर्वांना खात्री देतो, हा साखर कारखाना यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करेल…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *