कौलगे / प्रतिनिधी
मतदारसंघातीत प्रत्येक गाव-खेड्यात आमच्या मंडलिक गटाचे स्वाभिमानी कार्यकर्ते कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मंत्री हसन मुश्रीफ यांचा विजय निश्चित असून या ऐतिहासिक विजयात मंडलिक गटाचा सिंहाचा वाटा असेल. असा विश्वास हमिदवाडा कारखाना संचालक, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र युवा सेना पक्ष निरीक्षक विरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला.
कौलगे, ता. कागल येथे कौलगेसह नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
वीरेंद्र मंडलिक पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व माजी खासदार संजय दादा मंडलिक त्यांचा आदेश प्रमाण मानून मंत्री मुश्रीफ यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया.
हमिदवाडा कारखान्याचे संचालक विश्वास कुराडे म्हणाले, लोकनेते काही सदाशिवराव मंडलिक साहेबांचे येथील जनतेवर अनंत उपकार आहेत. त्यांनी या मतदारसंघाच्या विकासाचा यशस्वी पाया रचला. त्यांच्याच पाऊलवाटेवरून वाटचाल करीत मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय दादा मंडलिक यांनी विकास मंदिरावर कळस चढवण्याचे काम केले आहे.
कार्यक्रमात तानाजी सातपुते, हनुमंत माने, हमिदवाडा सरपंच दिलीप बुरटे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजेंद्र पाटील, के डी शिंदे गुरुजी, युवाशक्ती अध्यक्ष विजय लोकरे, भरत पाटील, कृष्णात पाटील, संजय भोसले, विनायक तुकान, दीपक देवडकर, चिखली सरपंच युवराज कुंभार, कृष्णात बुरटे, श्रीपती बुरटे त्यांच्यासह मंडलिक प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार अमोल पाटील यांनी मानले.
………………
कौलगे, ता. कागल येथे कौलगेसह नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना युवा नेते विरेंद्र मंडलिक व समोर उपस्थित कार्यकर्ते