December 22, 2024

कागल / प्रतिनिधी

  
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अख्ख कुटुंबच प्रचार कार्यात उतरले आहे. त्यांच्या पत्नी सौ. सायरा हसन मुश्रीफ यांच्यासह तिन्ही मुले, तिन्ही सुना, मुलगी व नातवंडेही प्रचारात रंगली आहेत.

वेगवेगळ्या सात ग्रुपच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर हा प्रचार होत आहे. उमेदवार म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा मुख्य फौजफाटा गेल्या महिन्याभरापासून प्रचारात आहे. त्यांच्यासोबत कु. सेहान आणि कु. उसेद ही दोन नातवंडे असतात. दुसरा ग्रुप आहे तो त्यांच्या पत्नी सौ. सायरा व त्यांच्या दोन नंबरच्या सुनबाई सौ. नबीला आबिद मुश्रीफ यांचा. या दोघी सासू- सून सकाळी आठ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडतात. दौऱ्यातील पहिल्या गावात पोहोचून तिथेच नाष्टा करून सुरुवात करतात. दुपारी जेवणापूरती अर्धा तास सुट्टी घेऊन पुन्हा अगदी रात्री दहा वाजेपर्यंत हळदीकुंकू, महिला मेळावे व वैयक्तिक भेटीगाठी सुरू असतात. आतापर्यंत बिद्री- बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघासह उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ त्यांनी पूर्ण करीत आणलेला आहे.

तिसरा ग्रुप आहे तो श्री. मुश्रीफ यांच्या मोठ्या सुनबाई सौ. सबिना साजिद मुश्रीफ आणि मुलगी सौ. निलोफर मतीन मनगोळी यांचा या दोघी नणंद- भावजय सकाळी आठ वाजता घराबाहेर पडतात. दौऱ्यातील पहिल्या गावातच चहा- नाष्ट्याने त्यांची सुरुवात होते. नंतर हळदीकुंकू, वैयक्तिक भेटीगाठी आणि शेत-शिवारामध्ये काम करणाऱ्या महिलांशी त्या संपर्क साधतात. आतापर्यंत त्यांनी कडगाव -गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघासह सेनापती कापशी खोरा व करंबळी, धामणे परिसरात संपर्क साधला आहे. चौथा ग्रुप आहे तो सर्वात धाकट्या सूनबाई सौ. अमरीन नवीद मुश्रीफ यांचा. त्याही सकाळी आठच्या सुमारालाच मुलगा आणि मुलगी खूप आहे या ना सोबत घेऊन प्रचार दौऱ्यावर निघतात. रात्री दहापर्यंत यांचाही प्रचार सुरूच असतो.

तसेच श्री. मुश्रीफ यांची तिन्ही मुले साजिद, आबिद व नवीद आपापल्या स्वतंत्र पातळ्यांवर निवडणुकीच्या जोडण्या लावण्यात आणि प्रचार कार्यात आहेत.

मुश्रीफसाहेब आमचे कमी आणि तुमचेच जास्त……..!

या सर्वच महिला मेळावे व हळदी- कुंकूमधून एक गोड तक्रार पुढे येते. ती म्हणजे मुश्रीफसाहेब आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला फार कमी वेळ मिळतात आणि ते तुम्हा समाजाचे जास्त होऊन गेलेत. किंबहुना; मतदारसंघातील जनता जनार्दन हेच आमचं कुटुंब आणि गोतावळा होऊन गेलाय……!

दुपारचे जेवण झाडाखाली…….!
प्रचाराच्या या सातही ग्रुपचे एक समान वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या सगळ्याच ग्रुपचे दुपारचे जेवण हे शेतात झाडाखालीच होते. घराकडून आणलेली भाकरी, झुणका, दही, खरडा या पद्धतीचे हे जेवण असते. कोणत्याही गावात कार्यकर्त्यांना जेवणाचा त्रास नको, या भूमिकेतूनच ही झाडाखालच्या जेवणाची कल्पना पुढे आली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *